VYOM Delight

VYOM Delight Digital Creator

माझी आजी मातीच्या भांड्यात जेवण बनवायची.खूप छान चव यायची जेवणाला.मातीच्या भांड्यांचा मोठा सेट होता तिच्याकडे. त्या काळात...
04/02/2026

माझी आजी मातीच्या भांड्यात जेवण बनवायची.खूप छान चव यायची जेवणाला.मातीच्या भांड्यांचा मोठा सेट होता तिच्याकडे. त्या काळात सगळेच अल्युमिनियम भांडी वापरायचे पण आजी मात्र मातीचीच वापरायची.

शेतातल्या तुरीच्या शेंगा काढल्या की त्याची झाड कापून वाळवून ठेवायची.मग झुणका वगैरे बनवताना चमचा न वापरता तुरीच्या दोन चार काड्या एकत्र घेऊन त्याचा चमच्यासारखा वापर करायची त्यामुळे अजूनच चव वाढायची.

रिंगा नावाचं फळ असायच त्याला पाण्यात टाकल्यावर खूप फेस यायचा.आजी नेहमी कपडे धुवायला तेच वापरायची आणि गंमत म्हणजे साबणाने धुतलेल्या कपड्यांपेक्षा तिने रिंगा वापरून धुतलेले कपडे अधिक चमकायचे.

काळासोबत सगळ्याच गोष्टी निघून गेल्या.तुरीच्या काड्या,मातीची भांडी, रिंगा आणि त्याच्या पेक्षाही मौल्यवान ......आजी....

🎭अंतरंग🎭

मटण वाले खूप हुशार असतात.एखाद माणूस त्यांना साधा दिसला की लगेच त्याला जुन किंवा शीळ मटण देतात. मच्छी असुदे की मटण माहितग...
03/02/2026

मटण वाले खूप हुशार असतात.एखाद माणूस त्यांना साधा दिसला की लगेच त्याला जुन किंवा शीळ मटण देतात. मच्छी असुदे की मटण माहितगार माणूस हवा.

माझ्या सासऱ्यांच्या बाबतीत एकदा अस झालं.गावी असताना मटण आणायला गेले.माणूस नवीन आणि शहरातून आलेला ओळखल मटण वाल्याने. पटापट मटण देऊन बोलला घरच्यांना सांगा थोड्या एक्स्ट्रा शिट्या द्यायला पण मटण भारीच आहे.सासरे बिचारे त्याच्यावर विश्वास ठेवून घरी आले. आम्ही मटण कधीच कुकर मधे शिजवत नाही.पातेल्यात दोन अडीच तास शिजवून देखील व्यवस्थित शिजलं नाही.

रात्री जेवायला दहा वाजून गेले. घरच्यांनी मटण वाल्याला भरपूर शिव्या घातल्या. पण शेवटी काय करणार. जेव्हा एक्स्ट्रा शिट्या द्यायला लागतील अस समजलं तेव्हाच ओळखायला हवं होत....

🎭अंतरंग🎭

भरपूर मेहनत घेऊन बनवलेले भोपळ्याचे घारगे. बऱ्याचशा रेसिपीज माहीत असतात पण तरीसुद्धा खात्री साठी युट्यूब ला सर्च करून पाह...
31/01/2026

भरपूर मेहनत घेऊन बनवलेले भोपळ्याचे घारगे. बऱ्याचशा रेसिपीज माहीत असतात पण तरीसुद्धा खात्री साठी युट्यूब ला सर्च करून पाहते. उगाच ओव्हरकॉन्डिडेन्स ने सगळा घोळ झाल्यावर काही उपयोग नाही आणि स्वतःच्या पाक कौशल्यावर म्हणावा तसा अजून विश्वास नाही.

रोजच जेवण कॉन्फिडन्स ने बनवू शकते पण हे स्पेशल पदार्थ बनवताना थोडी भीती वाटतेच. शेवटी मेहनत करून बनवलेले घारगे यशस्वी झाले यातच खूप समाधान वाटलं.

🎭अंतरंग🎭

कांदा भजी खायची असेल तर ती स्टॉल वरच जास्त चांगली मिळते.हॉटेल मधे असली तरी ती तितकीशी चविष्ट लागत नाही.मी दहावी नंतर कॉल...
30/01/2026

कांदा भजी खायची असेल तर ती स्टॉल वरच जास्त चांगली मिळते.हॉटेल मधे असली तरी ती तितकीशी चविष्ट लागत नाही.

मी दहावी नंतर कॉलेज ऍडमिशन चे फॉर्म भरायला गेले होते. सोबत दोन मैत्रिणी होत्या.संध्याकाळी भूक लागली म्हणून भजी खायला गेले. भजीच्या स्टॉल ची तशी अख्खी लाईनच होती.सगळीकडे भजीचा खमंग वास सुटला होता.आम्ही तीन जणीसाठी दोन प्लेट भजीची ऑर्डर दिली आणि वाट पाहत उभ्या होतो.

भजीच्या वासाने भूक अजूनच खवळली होती.कधी एकदा भजी हातात येते आणि खाते अस झालं होत.माझ्या अनुभवाप्रमाणे तरी नेमक्या अशाच वेळी ऑर्डर लवकर मिळत नाही.आता ऑर्डर दिलेल्या दोन प्लेट ही आम्हाला कमी वाटू लागल्या.

दहा वेळा आवंढे गिळून झाले पण भजी अजून कढईतच होती.शेवटी राहवेना म्हणून स्टॉल च्या आजुबाजूला फेऱ्या मारायला चालू केल्या.सहज स्टॉल च्या खाली लक्ष गेल. काळाकुट्ट पाण्याने तुडुंब भरलेलं छोटस गटार बरोबर स्टॉल च्या खालून गेल होत.त्यात पाण्यावर बरबरून फेस आलेला आणि अशात स्टॉल च्या खालच्या साईड ला ठेवलेली कोथिंबीर त्या गटारीच्या पाण्यात आपले शेंडे बुडवून मजा घेत होती. हे सगळ बघून भजीचा इतका किळस आला की तिथून तडक निघून जायची इच्छा झाली पण ऑर्डर तर दिली होती.

सोबत आलेल्या दोघींना ही खूप भूक लागलेली अशात त्यांना हा प्रकार दाखवावा की नाही अस झालं.बर कोथिंबीर चे खेळ स्टॉल वाल्याच्या लक्षात आणून देऊन ऑर्डर कॅन्सल करण्याइतके मोठे आणि धाडसी ही नव्हतो. भजी प्लेट हातात आली तशी मी लगेच बोलले मला ऍसिडिटी मुळे कसतरीच होतंय. तुम्ही खाऊन घ्या मी रूमवर गेल्यावर खाईन काहीतरी.

भुकलेल्या दोघी मैत्रिणींनी दोन प्लेट भजी दोन मिनिटात संपवली. रूमवर आल्या आल्या हा प्रकार सांगायच मी टाळलं कारण त्यांनी उलटी करून ती भजी काढली असती. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा प्रकार सांगितला तेव्हा त्यांची तोंड बघण्यासारखी होती.तेव्हापासून स्टॉल वर खाण शक्यतो टाळते.

अस नाही की हॉटेल मधे खूप स्वच्छता असतेच पण निदान ते डोळ्यांसमोर दिसत नाही....

🎭 अंतरंग 🎭

भक्तीने ओथंबलेले मन,श्रद्धेने सजलेले नैवेद्याचे ताट…बाप्पाच्या चरणी अर्पण केलेले ५६ भोगम्हणजे भक्तांच्या मनातला निस्सीम ...
30/01/2026

भक्तीने ओथंबलेले मन,
श्रद्धेने सजलेले नैवेद्याचे ताट…
बाप्पाच्या चरणी अर्पण केलेले ५६ भोग
म्हणजे भक्तांच्या मनातला निस्सीम विश्वास🌺

🎭अंतरंग🎭

भेंडीची भाजी कितीही टेस्टी लागली तरी बनवायला खूप कष्ट आहेत. भेंडी स्वच्छ धुवून सुकेपर्यंत ठेवा किंवा कपड्याने कोरड्या कर...
30/01/2026

भेंडीची भाजी कितीही टेस्टी लागली तरी बनवायला खूप कष्ट आहेत. भेंडी स्वच्छ धुवून सुकेपर्यंत ठेवा किंवा कपड्याने कोरड्या करून घ्या,किडलेली आहे की नाही हे बघून बघून चिरून घ्या,मग तेलात भाजून घ्या आणि नंतर फोडणी....... हुश्श..... किती तो उद्योग. किती ही आवडीची असली तरी ही भेंडी आमच्या घरी आठवड्यातून एकदाच बनते. चुकूनही दुसरी एन्ट्री होत नाही तिची.

🎭अंतरंग🎭

भोपळ्याचे घारगे करण्यासाठी मला लाल भोपळा हवा होता. हे घारगे मी प्रसादासाठी करणार होते.आधी समजल शनिवारी प्रसाद द्यायचा आह...
29/01/2026

भोपळ्याचे घारगे करण्यासाठी मला लाल भोपळा हवा होता. हे घारगे मी प्रसादासाठी करणार होते.आधी समजल शनिवारी प्रसाद द्यायचा आहे पण रात्री समजल आजच द्यायचा आहे. मग लगेच डिलिव्हरी ॲप वरून भोपळा मागवला.पंधरा मिनिटात हा सुंदर छोटुसा भोपळा आमच्या घरी आला. याच्याकडे बघून याला कट करायची इच्छा होत नाहीये....😃

🎭अंतरंग🎭

एक आपल्या आजी आजोबांची पिढी होती ज्यावेळी तेल मुश्किलीने मिळायच आणि मिळालं तरी खूप कमी वापरायचे. त्यानंतर आली आपल्या आई ...
28/01/2026

एक आपल्या आजी आजोबांची पिढी होती ज्यावेळी तेल मुश्किलीने मिळायच आणि मिळालं तरी खूप कमी वापरायचे.

त्यानंतर आली आपल्या आई वडिलांची पिढी.या पिढीत जो तेल जास्त खाईल तो श्रीमंत.प्रत्येक जण मोठेपणाने आपल्या घरी किती तेलाचे डबे लागतात हे सांगायचं.मला आठवतय आमच्या शेजारच्या एक काकू आपल्या भाजीतल्या तेलाचा ओघळ कसा भाकरी वरून खाली वाहत येतो हे मोठेपणाने सांगायच्या.आमचे एक शिक्षक तर वर्षाला वीस डबे तेल वापरतो अस छाती फुगवून सांगायचे.मग या पिढीला आता डॉक्टरांनी तेल खायला मनाई केली.आता बिनतेलाच जेवण जेवत आहेत.

आमची पिढी आई वडिलांचा अनुभव घेऊन कमी तेल वापरायला लागली आहे.काहीजण फक्त उकडलेल्या भाज्या खातायत.म्हणजे फिरून आपण आजी आजोबांच्या पिढीतच आलो नाही का.

टीप: हा अनुभव माझा आहे .तुमचा वेगळा असू शकतो. त्यामुळे कोण तेल जास्त खात ,खात नाही यावर वादविवाद करू नये.

🎭अंतरंग🎭

शेंगदाणे आणून खूप दिवस झाले पण ते भाजून ठेवायचा मुहूर्त काही निघेना. प्रत्येक वेळी लागेल तेव्हा गडबडीत भाजून घ्यायचे आणि...
28/01/2026

शेंगदाणे आणून खूप दिवस झाले पण ते भाजून ठेवायचा मुहूर्त काही निघेना. प्रत्येक वेळी लागेल तेव्हा गडबडीत भाजून घ्यायचे आणि वापरायचे अस चालू होत.शेवटी आज भाजीसाठी मोठी कढई घेतलीच होती तर म्हटलं आळस झटकून शेंगदाण्यांना चटका देऊनच घेऊ.अशी बरीचशी काम असतात जी आज करू उद्या करू म्हणत पुढे ढकलतो आणि मग ऐनवेळी फजिती होते.

🎭अंतरंग🎭

रविवारी सकाळी साडेसात वाजता नवऱ्याचा फोन वाजला.दोनच मिनिटात तो घाईघाईत निघून गेला.मला वाटलं खाली काहीतरी काम असेल. बराच ...
28/01/2026

रविवारी सकाळी साडेसात वाजता नवऱ्याचा फोन वाजला.दोनच मिनिटात तो घाईघाईत निघून गेला.मला वाटलं खाली काहीतरी काम असेल. बराच वेळ झाला आला नाही. मग साडे नऊ वाजता मी कॉल केला तेव्हा समजल आमचा एक जवळचा मित्र सिरीयस असल्याने त्याला हॉस्पिटल मधे ऍडमिट केलं.आमच्याच ग्रुप मधला. नवऱ्याचा लहानपणीचा मित्र.खूप चांगली ओळख आमची.सगळे एकत्र फिरायला,जेवायला जायचो.रात्री अचानक छातीत दुखायला लागलं आणि लगेच त्याला ऍडमिट केलं.

दिवभर मी दहा वेळा मनातल्या मनात प्रार्थना केली, काहीही झालं तरी फक्त बरा होऊन घरी येऊदे.घरी त्याची आई, बायको आणि लहान मुलगी होती. दिवसभर नवऱ्याने एक दोन वेळा अपडेट दिली की ICU मधे आहे. संध्याकाळी एकाच स्टेटस पाहिल आणि धक्काच बसला.रात्री ऍडमिट केलं तेव्हाच तो जग सोडून निघून गेला होता. वय अवघे चौतीस वर्षे.मी घाबरू नये म्हणून नवऱ्याने याची काही कल्पना मला दिलीच नाही.

आधी दोन दिवस त्यांच्या घरी हळदी कुंकू साठी जाऊन आले.हसत खेळत बोलला होता.मला विश्वासच बसत नव्हता.माझी आई देखील अशीच अचानक गेल्याने त्याच्या कुटुंबावर काय परिस्थिती आली असेल हे मी समजू शकत होते. ग्रुप मधला एक हसता खेळता व्यक्ती कायमचा निघून गेला.

🎭अंतरंग🎭

केरळ ला गेलो होतो तेव्हाचा एक अनुभव. Alleppey वरून कोचिन एअरपोर्ट ला यायला निघालो. हॉटेलच चेकआऊट सकाळी अकरा वाजता होत आण...
28/01/2026

केरळ ला गेलो होतो तेव्हाचा एक अनुभव. Alleppey वरून कोचिन एअरपोर्ट ला यायला निघालो. हॉटेलच चेकआऊट सकाळी अकरा वाजता होत आणि फ्लाईट रात्री नऊ ची. Alleppey ते कोचिन फक्त चार तासाचा प्रवास. मग सकाळी अकरा पासून रात्री नऊ पर्यंत करणार काय तेच समजत नव्हतं. टूर्स वाल्यांनी एवढ्या उशिराची फ्लाईट बूक केल्याने राग तर आलाच होता पण म्हटलं जाऊदे भेटलाय वेळ तर जाता जाता फिरू कुठेतरी.

ड्रायव्हर ने एक म्युझियम असल्याचं सांगितलं.खरतर म्युझियम वगैरे निवांत पाहण्याचं ठिकाण. दुसरा काही ऑप्शन नसल्याने म्हटलं बघू कस आहे.तिथे गेलो तर प्रत्येकी दोनशे रुपये तिकीट.दोघांचे चारशे रुपये घालून आत एन्ट्री केली.

आत मधे खरच खूप काही पाहण्यासारख होत. जुन्या हिंदू मंदिरांचे बरेचसे अवशेष तिथे ठेवले होते.दहा दहा फूट उंच लोखंडी दीप स्तंभ,जवळपास पाच सहा फूट व्यासाची पितळेची समई, बाराशे च्याही आधीच्या काळातील सुंदर रेखीव मूर्ती ,नाजूक कोरीव काम केलेल्या चौकटी, दरवाजे आणि बरच काही.या सगळ्या वरून केरळ मधे हिंदू संस्कृती किती प्राचीन होती हे दिसून येत.उगाच त्याला god's own country म्हणत नाहीत.

हे सगळ जून सोन एकत्रित करून म्युझियम उभारण्याचं काम एका christian व्यक्तीने केलं होत. खूप चांगलं काम केलं त्यांनी पण वाईट एका गोष्टीच वाटलं ते म्हणजे हिंदू लोकांना का सुचलं नसेल आपली संस्कृती जतन करून ठेवावी.आपलीच संस्कृती पहायला दुसऱ्यांना प्रत्येकी दोनशे रुपये देऊन तिथे जावं लागत.

मला सगळ्या जाती धर्मांचा आदर आहे आणि हिंदू संस्कृती चा तर जास्तच. आपली संस्कृती जपायच काम दुसऱ्या धर्माचे लोक करत आहेत पण आपल्याला त्याची जराही किंमत नाही. एवढ सगळ प्राचीन सोन बघून कळलं की तिथे खूप मंदिर होते असतील पण आताच्या काळात दूरदूर पर्यंत मंदिर दिसत नाही. भविष्यात आहे ती मंदिर पण दिसतील की नाही याची भीती आहेच.

🎭अंतरंग🎭

संध्याकाळ झाली की काहीतरी चमचमीत खायची इच्छा होतेच.पण जीभेने कितीही उड्या मारल्या तरी रोज चमचमीत खाता येत नाही.शेवटी शरी...
27/01/2026

संध्याकाळ झाली की काहीतरी चमचमीत खायची इच्छा होतेच.पण जीभेने कितीही उड्या मारल्या तरी रोज चमचमीत खाता येत नाही.शेवटी शरीराची काळजी करायलाच हवी.

कधी मधी घरी देखील बनवते पण आयत खायला मिळत नाही.भजी बनवून नंतर त्याचा पसारा घासत पुसत खाल्लेल्या मूग भजीची मजा कुठच्या कुठे निघून जाते. पुण्यात असताना कधी मुगभजीचा स्टॉल पहिला नाही.असेल ही पण मला माहीत नव्हता. मुंबईत मात्र घरा शेजारीच मस्त मुगभजी मिळते.त्यामुळे पंधरा दिवसातून का होईना मुगभजी घरी हजेरी लावते आणि अशात जिभेची दिवाळी साजरी होते.

🎭अंतरंग🎭

Address

Mumbai
400101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VYOM Delight posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share