18/10/2023
वयाच्या प्रत्येक टप्प्यात एक शिकवण असते,
आयुष्य संपले , तरी काहीतरी वणवण असते.
म्हातारपण आणि बालपण दोघेही सारखे असते म्हणे,
एकात काही ज्ञात नसुन फक्त वेडेपण असते, एकात
वेड्यासारखे राहावे लागते, पण सर्वकाही ज्ञात असते.
यावयात असतो अनुभव आणि सर्वांसाठी तळमळ असते.
वयाच्या प्रत्येक टप्प्यात एक शिकवण असते.
प्रत्येकाच्या आयुष्यात हे काळ येतातच आणि प्रत्येकाला ती मजा चाखायला मिळतेच पण काही लोक यापासुन अलिप्त ही असु शकतील काहीना लवकर मृत्यु येतो, तर काहींना मृत्यु पर्यंत कळत नाही की काय चाललय ते.
यात तीन वयाचे टप्पे आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव आहे,
एक ज्याच्या मनात प्रश्न आहे, सोडवण्याची ताकत आहे, पण इच्छाशक्ती कमी पडतेय.
दुसरा ज्याच्या मनात प्रश्न आहे, आश्चर्य आहे, आणि आशा आहे की कोणीतरी ते सोडवेल.
तिसरा ज्याला माहिती आहे काय होतंय आणि याचा काय परिणाम होईल हे सुद्धा माहिती आहे, त्यामुळे होतंय ते झालेच पाहिजे त्याच्यानुसार पुढे काहीतरी होणार आहे हे समजले आहे.
आणि ही समज तुम्हा पूर्णत्वाला घेऊन जाते.
-PK